आचारसंहिता मुळे येणारी बंधनं….
╭════ || निवडणूक स्पेशल.
आचारसंहिता लागू झाली म्हणजे सर्व सरकारी कामं बंद असा सर्वसामान्यांचा समज असतो. पण नक्की काय करण्यावर बंदी आहे? हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता आहे…
🎯 ‘ही’ कामं सुरूच राहणार :
1. पेंशनचं काम.
2. आधारकार्ड बनवणं.
3. जाती प्रमाण पत्र बनवणं.
4. वीज आणि पाण्यासंबंधी काम.
5. साफसफाई संबंधी काम.
6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं.
7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम.
8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही.
9. आचारसंहितेच्या काळात अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत.
10. घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलेल्यांचे आराखडे पास होतील. मात्र नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.
🚫 ‘या’ गोष्टींवर बंदी :
1. सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद.
2. नव्या कामांचा स्वीकार बंद.
3. सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत.
4. मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत.
5. सरकारी वाहनांना सायरन नाही.
6. सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील.
7. सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.
8. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत.
9. कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.
10. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करा.
👉🏻ही माहिती आवर्जून तुमच्या मित्र परिवारांना शेअर करा..